मुंबई, वृत्तसेवा । तुकाराम मुंढे यांची बदली राज्य सरकारने अवघ्या १५ दिवसांत रद्द केली आहे. कडक शिस्तीचे अधिकारी म्हणून ते ओळखले जातात. मात्र, नेमक्या कोणत्या कारणांमुळे ही बदली झाली हे स्पष्ट स्पष्ट होऊ शकलेलं नाही.
नागपूर महापालिका आयुक्तपदावरून तुकाराम मुंढे यांची बदली करण्यात आली होती. २६ ऑगस्ट रोजी या बदलीचे आदेश निघाले होते. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या सदस्य सचिवपदी ही बदली करण्यात आली होती. मात्र, अवघ्या १५ दिवसांतच अचानक आज मुंढे यांच्या बदलीचा आदेश रद्द करण्यात आले आहेत.
तुकाराम मुंढे यांच्या बदलीचे आदेश रद्द करताना आता मदत व पुनर्वसन सचिव किशोर राजे निंबाळकर यांच्याकडे महाराष्ट्र जीवन प्राधिकरण (मुंबई) सदस्य सचिव पदाचा अतिरिक्त कार्यभार सोपविण्यात आला आहे. तसे आदेश आज जारी करण्यात आले आहेत.