पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम अंतर्गत जिल्हा शल्य चिकित्सक डॉक्टर किरण पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉक्टर सचिन भायेकर यांच्या मार्गदर्शनाखाली तालुका आरोग्य विभाग व कुटीर रुग्णालय अंतर्गत तारीख 23 डिसेंबर ते 3 जानेवारी पर्यंत क्षय रुग्ण शोध मोहिमेस सुरुवात झाली आहे. या मोहिमे दरम्यान तब्बल 22 स्वयंसेवकांकडून 4489 घरांना भेटी दिल्या जाणार असून यावेळी नागरिकांना या आजाराबाबत निदान व उपचार पद्धतीबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे. दरम्यान या शोध मोहिमेत आशा वर्कर, आरोग्य सेवक,आरोग्य सेविका यांच्यासोबत सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्थेचा सहभाग राहणार आहे. क्षय रुग्ण शोध मोहीम अभियान अंतर्गत सर्वेक्षणासाठी तालुक्यासह शहरातील दाट वस्तीच्या अति जोखीम लोकसंख्या असलेल्या भागात दोन लाख 24 हजार 433 लोकसंख्या पैकी तालुक्यातील 22,443 लोकसंख्या उद्दिष्ट स्वयंसेवकांना देण्यात आले आहे.
क्षय आजाराची लक्षणे
दोन आठवडा पेक्षा जास्त खोकला, ताप येणे, भूक मंदावणे, वजन कमी होणे, अंगावर गाठी अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींची शोध मोहिमेत संदर्भ चिट्ठी देत त्यांची त्या त्या ठिकाणच्या रुग्णालयात तपासणी करून तात्काळ त्यांच्यावर उपचार केले जाणार आहेत. चौकट क्रमांक दोन एक्स-रे व थुंकी तपासणी क्षयरोग शोध मोहीम अभियान अंतर्गत स्वयंसेवकांनी केलेल्या गृहभेटीदरम्यान संशयीत रुग्णांसाठी एक्स-रे, थूंकी तपासणी मोफत केली जाणार आहे. यावेळी रुग्णालयातील थुंकी तपासणी सूक्ष्मदर्शीका यंत्र व नॅट मशीन वरून निदान होणे सोईचे जाणार आहे.
चौकट क्रमांक तीन सर्वेक्षण कालावधीत वरील प्रमाणे होणार तपासणी शोध मोहीम अंतर्गत वीट भट्टीवरील कामगार, वृद्धाश्रम, बेघर निराधार,डायबिटीस,तंबाखू धूम्रपान व दारू पिणारे, अगोदर टिबी होऊन गेलेला वेक्तीगिरणी कामगार, कुपोषित ,एच आय व्ही यांची देखील प्रत्यक्ष भेट देऊन स्वयंसेवकांच्या माध्यमातून तपासणी केली जाणार आहे. त्यामुळे क्षय आजाराची भीती न बाळगता नागरिकांनी लक्षणे न लपवता तात्काळ नजीकच्या रुग्णालयात तपासणी करावी असे आवाहन करण्यात आले आहे. चौकट क्रमांक चार सर्वेश्वर संस्थेचा सहभाग घेतला आहे. गेल्या दहा वर्षापासून येथील सर्वेश्वर बहुउद्देशीय विकास संस्था ही क्षय रुग्णांसाठी काम करीत आहे.
संस्थेचे अध्यक्ष संजय पाटील व सचिव आशा पाटील हे शोध मोहिमेत सहभागी होता. तसेच शहरातील उपचारावर असलेल्या शहर रुग्णांसाठी ते वेळोवेळी उपचारा वेळी डॉक्टरांच्या सल्ल्याने रुग्णांना सहकार्य करतात. त्यामुळे सर्वेश्वर संस्थेचा सहभाग रुग्णांसाठी मोठा आधार बनला आहे. दरम्यान 23 डिसेंबर ते 3जानेवारी पर्यंत या मोहिमेत ग्रामीण भागासह शहरी भागातील नागरिकांनी स्वयंसेवकांना सहकार्य करावे असे आवाहन तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर चंद्रकांत सूर्यवंशी, वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर प्रशांत रनाळे, वैद्यकीय अधिकारी डॉ. जिनेन्द्र पाटील यांनी केले आहे.
यावेळी वरिष्ठ क्षय रोग उपचार पर्यवेक्षक भगवान चौधरी, चंद्रात्रे हे स्वयंसेवकांना सहकार्य करीत आहे.