Home क्राईम मोहराळा येथील तरूणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न

मोहराळा येथील तरूणाचा आत्महत्या करण्याचा प्रयत्न


Yawal1

यावल (प्रातिनिधी)। तालुक्यातील मोहराळा या गावातील एका तरूणाने आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची घटना घडली असुन, आत्महत्याचे प्रयत्न करणाऱ्या तरूणास उपचारासाठी यावलच्या ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

 

याबाबतची मिळालेली माहीती अशी की, यावल तालुक्यातील मोहराळा येथे राहणारा तरुण सुभेदार नबाब तडवी (वय-19) यांने दिनांक ११ रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास आपल्या राहत्या घरात गळफास घेवुन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असता सदरचा प्रकार गावातील मंडळीला या घटनेची माहीती मिळताच ग्रामस्थ तरूणांनी सुभेदार तडवी घराकडे धाव घेवुन तात्काळ वाचविले व त्यास तात्काळ यावलच्या ग्रामीण रुग्णालयात उपराचा साठी दाखल करण्यात आले असुन, ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. शुभम जगताप यांनी प्रथम उपचार केले असुन, त्या तरूणाची प्रकृती सुधारीत असल्याचे वृत आहे. सदर या तरुणाने आत्महत्या चा प्रयत्न का केले हे समजु शकले नाही.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound