जळगाव प्रतिनिधी । महिला ही सबला असून आम्ही आता रडणार नाही तर लढण्यासाठी सज्ज असल्याचे प्रतिपादन भूमाता ब्रिगेडच्या अध्यक्षा तृप्ती देसाई यांनी केले. त्या ‘एक महिला रात्र’ या कार्यक्रमाआधी बोलत होत्या.
जिल्हा महिला असोसिएशन आणि भूमाता ब्रिगेड यांच्या संयुक्त विद्यमाने महिला दिनाच्या आदल्या रात्री ‘एक महिला रात्र’ या अभिनव कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. यात काव्यरत्नावली चौकात रात्री विविध कार्यक्रम घेण्यात आले. यानंतर काव्यरत्नावली चौक ते छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यापर्यंत भव्य रॅली काढण्यात आली. या संदर्भात आपली भूमिका मांडतांना तृप्ती देसाई म्हणाल्या की, आम्ही आता लढण्यासाठी सज्ज झालो आहोत. महिला या रात्रीदेखील कुठेही जाऊ शकतात हा संदेश देण्यासाठी आम्ही एक महिला रात्र कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. यात जळगावातून अतिशय उत्तम प्रतिसाद लाभल्याबद्दल त्यांनी कौतुक केले. या रॅलीच्या माध्यमातून स्त्री-पुरूष समानता आणि
पहा : तृप्ती देसाई नेमक्या काय म्हणाल्या ते !