
जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील गिरणा पंपिंग रोड परिसरातून अज्ञात चोरट्यांनी चक्क एक ट्रक चोरून नेल्याची घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

याबाबत गजानन मधुकर बारी (वय २६, रा. हरिविठ्ठल नगर, जळगाव) यांनी या संदर्भात तक्रार दिली आहे. निलेश संजय सपकाळे यांच्या मालकीचा असलेला ट्रक (क्रमांक MH 19 CY 4836) हा जळगाव तालुका हद्दीतील गिरणा पंपिंग रोडवरील संजय सपकाळे यांच्या शेताजवळ पार्क केलेला होता. सदर चोरीची घटना ६ ऑक्टोबर २०२५ च्या सायंकाळी ७ वाजेपासून ते ७ ऑक्टोबर २०२५ च्या सकाळी ९ वाजेच्या दरम्यान घडली. चोरट्यांनी पांढऱ्या रंगाची कॅबीन आणि निळ्या रंगाचे करिअर असलेला हा जुना वापरता अडीच लाख रूपये किंमतीचा ट्रक चोरून नेला आहे.
याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय पाटील हे करीत आहे.



