पाचोरा प्रतिनिधी । पावसामुळे दुर्दशा झालेल्या रस्त्यावर आज सकाळी ट्रक अडकून पडला असून यात सुदैवाने कुणाला इजा झाली नाही.
याबाबत वृत्त असे की, भुयारी गटारीतच्या कामांमुळे शहरातील अनेक रस्ते खराब झाले आहेत. या पार्श्वभूमिवर, भडगाव रोडवरील साई मंदिरा जवळ एमएच १८ बीजी ७७१२ या क्रमांकाचा ट्रक अडकून पडला आहे. रस्त्यावरच भला मोठा खड्डा पडल्यामुळे हा ट्रक अडकून पडल्याचे दिसून येत आहे. सुदैवाने यात कुणालाही इजा झालेली नाही. शेवटचे वृत्त हाती आले तोवर हा ट्रक खड्डयात अडकून पडलेला होता.
दरम्यान, हा ट्रकचालक रस्त्यावरून जात असतांना समोर एक डबलसीट दुचाकीस्वार समोरून जात असतांना घसरला. मात्र ट्रक हळू असल्याने चालकाने याला तातडीने नियंत्रणात आणून दोघांचे प्राण वाचविल्याची माहिती प्रत्यक्षदर्शींनी दिली. नगरपालिकेने या रस्त्याची तातडीने डागडुजी करण्याची मागणी होत आहे.