Home क्राईम लग्नाच्या मंडपात ट्रक घुसला ; 13 जण ठार,18 जखमी

लग्नाच्या मंडपात ट्रक घुसला ; 13 जण ठार,18 जखमी


प्रतापगड (वृत्तसंस्था)- चालकाचे नियंत्रण सुटल्याने राजस्थानच्या प्रतापगड जिल्ह्यात एका लग्नात घुसलेल्या ट्रकमुळे १३ जण जागीच ठार झाले असून तब्बल १८ वऱ्हाडी गंभीर जखमी झाले आहेत. मृतांमध्ये चार लहान मुलांचा देखील सहभाग आहे. दरम्यान,बिंदोली येथे सुरू असलेला हा लग्न समारंभ रात्रीच्या वेळेस कदाचित ट्रक ड्रायव्हरला दिसला नसावा, त्यामुळेच दुर्घटना घडल्याचा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे.

या संदर्भात अधिक असे की, निंबाहेडाहून बांसवाडा येथे जाणाऱ्या राष्ट्रीय महामार्ग 113वर ही घटना घडली आहे. या महामार्गावर रामदेव मंदिराजवळ भरधाव वेगाने येणाऱ्या ट्रकवरील चालकाचे अचानक नियंत्रण सुटले आणि तो ट्रक रस्त्याच्या बाजूलाच सुरू असलेल्या लग्न मंडपात घुसला. या अपघातात चार लहान मुलांसह 13 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 18 जण जखमी आहेत. जखमींना तात्काळ जवळच्याच रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मृतांपैकी दौलतराम (60), भारत (30), शुभम (5), छोटू (5), दिलीप (11), अर्जुन (15), ईशु (19), रमेश (30) आणि करण (28) यांची ओळख पटली आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound