
अमळनेर (प्रतिनिधी) आपल्या जळगाव जिल्ह्याची शान असलेले विजय चौधरी पहिलवान हे नाव साऱ्या महाराष्ट्रात सुप्रसिद्ध आहे. युद्ध देवता तथा भूमीपुत्र श्री मंगळदेव ग्रह देवतेवर समस्त चौधरी परिवाराची खूप श्रद्धा आहे. विजय चौधरी यांनी महाराष्ट्र केसरी पदाची हॅट्ट्रिक पूर्ण केल्यानंतर ते आई,वडील व बंधूंसह दर्शन व अभिषेकासाठी आले होते.
आता विजय चौधरी डीवाय.एस. पी. झाले आहेत . या निमित्ताने करिअरच्या क्षेत्रातील त्यांचे एक स्वप्न पूर्ण झाले आहे . आता त्यांचे हिंदकेसरी पदाच्या स्वप्नपूर्तीसाठी ते श्री मंगळदेव ग्रहाचे आशीर्वाद घेण्यासाठी आले होते. तर त्यांच्या आई-वडिलांनी मात्र विजयजींच्या लवकर लग्नासाठी देवाला साकडे घातले. महाराष्ट्र केसरी डीवाएसपी विजय चौधरी यांचा सत्कार मंगळग्रह संस्थानचे अध्यक्ष डिगंबर महाले व विश्वस्त मंडळ यांनी केला. मंगळग्रह संस्थान बाबतीत सविस्तर माहिती हिंदी केसरी विजय चौधरी यांनी संस्थानचे अध्यक्ष व विश्वस्तांकडून जाणून घेतली. मंदिराचा आजूबाजूचा रम्य परिसर,शांतता, स्वच्छता, शिस्त याबाबत त्यांनी संस्थानचे अभिनंदन केले.