आसनसोल (वृत्तसंस्था) पश्चिम बंगालमध्ये चौथ्या टप्प्याच्या मतदाना दरम्यान हिंसा भडकली आहे. आसनसोलच्या जेमुआमध्ये तृणमूल काँग्रेस आणि भाजपच्या कार्यकर्त्यांमध्ये हाणामारी झाल्यामुळे जबरदस्त तणाव निर्माण झाला आहे.
हाणामारीचे नेमके कारण अद्याप समोर आलेले नाही. परंतु या हाणामारीत दोन्ही बाजूने जोरदार हल्ला करण्यात आला. दोन्ही पक्षातील काही कार्यकर्त्यांना ताब्यात आणण्यासाठी पोलिसांनी लाठीचार्ज देखील करावा लागला होता.