धानोरा येथे बसस्थानक नसल्याने प्रवाशाचे हाल

9d109570 8d69 4244 b7ca ebdcf6b666d6

 

धानोरा ता.चोपडा (विलास सोनवणे) अंकलेश्वर – ब-हानपुर या राज्य माहामार्गावर वसलेले धानोरा हे चोपडा तालुक्यातील अतिमहत्वाचे गाव म्हणुन ओळखले जाते. मात्र गावाच्या बाहेर असलेल्या बसस्थानकाच्या दुरावस्थामुळे गाव तसे चांगले, मात्र गावाला बसस्थानकच नसल्यामुळे प्रवाशाचे मोठ्या प्रमाणात हाल होत आहेत.

 

प्र.धानोरा हे गाव 23-25 हजार लोकवस्तीचे असून परिसरातील 36 खेड्यातील नागरिकांचा दररोज दैनंदिन व्यवहारासाठी याच ठिकाणी येत असतात. त्यात बिडगाव,मोहरद,कुड्यापाणी,चिचोली,पंचक,लोणी,खर्डी,अडावद,देवगाव,पारगाव,मितावली,वरगाव्हान,गावाचे प्रवाशी धानोरा येथेच ये-जा करत असतात.परंतु धानोरा येथे बसस्थाक अभावी प्रवाश्याचे मोठ्या प्रमाणावर हाल होत आहेत. चोपड्याहून येणारी गाडी यावल की, जळगाव ? या संभ्रमात प्रवासी कायम असतात.

 

 

धानोरा हे गाव बाजारपेठेच्या दृष्टीने मोठे गाव असून परिसरातल्या खेळेगावाच्या विद्यार्थी ,प्रवाशी ये-जा बघता या ठिकाणी नविन बसस्थानक होणे गरजेचे असल्याची प्रतिक्रिया प्रा.रेखा महाजन यांनी दिली आहे. त्यामुळे पुढील महिन्यात निवडून येणारे नवीन खासदार धानो-यावर लक्ष देतील का? असा सवाल देखील उपस्थित होत आहे. गेल्या अनेक वर्षापासुन प्रलंबित असलेल्या बसस्थानकाचा प्रश्न सोडवणे गरजेचा असून त्यासाठी याठिकाणी नविन टि-पाईप बसस्थानक बांधण्यात यावे. जेणेकरुन तिन्ही महामार्गावरुन धावणा-या बसेस प्रवाशांना समजतील आणि त्यांची धावपळ होणार नाही.

 

धनोऱ्याच्या प्रलंबित बसस्थानकाकडे कोणत्याच लोकप्रतिनिधीनी लक्ष दिलेले नाही. लक्ष दिले असते तर कदाचित आज प्रवाशांचे हाल झाले नसते. या समस्येकडे आता महामंडळने लक्ष देणे गरजेचे असून बसस्थानकाची नव्याने उभारनी करण्यात यावी, या आशयाचे अनेक ठराव देखिल ग्रामपंचायतमार्फत देण्यात आले आहेत. परंतु या ठरावाची अंमलबजावणी होत नाहीय.

 

 

चोपडा, यावल, जळगाव येथील बसेस या ‘टि-पाईप’वर थांबतात. त्यामुळे बस आल्यावर प्रवाशाची तांराबळ उडते. अशावेळी मोठा अपघात होण्याची शक्यता नकारता येत नाही. तसेच जवळ प्रथमीक व माध्यामिक शाळा असल्यामुळे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. तर राज्यमहामार्गावरुन अवजड वाहनांची रहदारी दिवसभर असल्यामुळे त्यामुळे देखिल मोठा अपघात होण्याची भीती कायम असते. धानोरा बसस्थानकाची दुरावस्था गेल्या अनेक वर्षापासुन आहे,तशीच आहे. जळगाव जाणारे बरेच प्रवाशी यावल जुने बसस्थानकावर उभे राहतात.पंरतू जळगाव गाडी केव्हा येते व गाडी केव्हाच निघून जाते, यांचा थागंपत्ता देखील लागत नाही. बसस्थानकाची सोय नसल्याकारणाने प्रवाशी उन्हाळ्यात व पावसाळ्यात बसण्यासाठी झाळे व पत्रांचा आडोसा घेऊन उभे राहतात. प्रवाशांना बसायल जागा नाही. एखाद्या फाट्यावर उभे राहुन बसेचची वाट पाहावे लागते,अशी परिस्थिती धानोरा बसस्थानकावर कायम पाहण्यास मिळत आहे.

One Response

  1. Samadhan Mahajan

Add Comment

Protected Content