जळगाव प्रतिनिधी | सूर्यग्रहणासारखे अंतराळातील रोमांचकारी सौंदर्य बघणे खूपच दूर्मिळ असते. खगोल प्रेमींसाठी ही एक सुवर्णसंधीच होती. गुरुवारचे कंकणाकृती सूर्यग्रहण महाराष्ट्रात खंडग्रास दिसणार असल्याने त्रिमूर्ती शिक्षण प्रसारक मंडळ संचालित त्रिमूर्ती इन्स्टिटयूट ऑफ फार्मसीच्या विद्यार्थी व शिक्षकांनी सूर्यग्रहण बघण्याचा आनंद लुटला.
यावेळी महाविद्यालयातर्फे सुमारे ३०० विद्यार्थ्यांना चष्मे उपलब्ध करून देण्यात आले होते. परिक्षा असल्याने काही विद्यार्थ्यांनी महाविद्यालयात तर काहींनी घरी सूर्यग्रहण बघण्याचा अनुभव घेतला. यावेळी उमेश महाजन यांनी सूर्यग्रहण कसे होते. याबद्दल विद्यार्थ्यांना शास्त्रीय माहिती दिली. प्रसंगी विद्यार्थ्यांनी वेगवेगळे प्रश्न विचारून आपल्या शंकांचे निरसन करून घेतले. या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन मनोज पाटील यांनी कौतुक केले.
यांची होती उपस्थिती
यावेळी त्रिमूर्ती फार्मसी बीफार्मचे प्राचार्य हर्षल तारे, डी.फार्म.चे प्राचार्य प्रांजल घोलप, प्रा. बाळकृष्ण बाहेती, अश्विनी पाटील, लोकेश बरडे, स्वप्नील देव, स्वाती येवले, महेश हराळे, समीर तडवी, रिया शेख, अमोल चौधरी, योगेश चौधरी, अजिंक्य जोशी, मयुरी.डी. पाटील, मयुरी.के. पाटील, रोहित पाटील, ललित जैन, सागर पाटील, प्रणाली थोरात, हर्षदा वाघ, पूनम पाटील, सचिन जाधव, हर्षल जाधव, मनिष महाजन, भुरसिंग पाटील, अनिल बारी आदी उपस्थित होते.