भडगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गोंडगाव येथील चिमुकलीवर अत्याचार करून खुन केल्याची घटना घडली होती. या घटनेतील आरोपीला फाशीची शिक्षा करावी यासह चिमुकलीच्या आत्म्यास शांती मिळावी यासाठी भडगाव तालुक्यातील पासर्डी गावात कॅण्डल रॅली काढून श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
या घटनेतील आरोपीस तात्काळ फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरिता जलदगती न्यायालयात हा खटला चालविण्यात यावा, तसेच या खटल्याचे कामकाज चालविण्यासाठी सुप्रसिद्ध विधीतज्ञ व सरकारी वकील उज्वल निकम यांची नियुक्ती करण्यात यावी, या मागन्यासाठीसाठी तसेच कल्यानीच्या आत्म्यास चिरशांती लाभावी म्हणून पासर्डी व घुसर्डी येथे ८ ऑगस्ट रोजी कॅण्डल रॅलीचे आयोजन करण्यात आले होते तरी गावातील पुरुष, महिला, मुले-मुली, विद्यार्थी, विद्यार्थीनी, राजकीय क्षेत्रातील जेष्ठ श्रेष्ठ नागरिक व इतर क्षेत्रातील मंडळी यांनी मोठ्या संख्येने आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित होते.
जोरदारपणे घोषणाबाजी करून सबंध परिसर दणाणून सोडण्यात आला होता. “चिमुकली कल्याणीची हत्या करणार्या नराधमाला फाशीची शिक्षा झालीच पाहिजे”, सदर केस जलदगती न्यायालयात वर्ग करावी…! ऍड उज्वल निकम साहेबांची या केसमध्ये नियुक्ती करून आरोपीला फाशी द्या…!अशा प्रकारच्या जोरदार घोषणा याठिकाणी देण्यात आल्या…!
यावेळी माध्यमिक विद्यालय घुसर्डी. व जि.प.प्राथमिक शाळा पासर्डी येथील शाळेचे सर्व विद्यार्थी तसेच जय बजरंग ग्रुपचे अध्यक्ष सागर गढरी, उपाध्यक्ष प्रदीप पाटील, व सदस्य सौरवभाऊ चावरे, रणजित चावरे, भारत सोनवणे, कोमल चावरे, सचिन चावरे, सतीश मोकळे, श्याम गायकवाड, शुभम पाटील, निलेश पाटील, ईश्वर सोनवणे, रामदास पवार, उमेश सोनवणे, चेतन पाटील, कल्पदिप गढरी, रघुनाथ चावरे, राजेश पाटील, हर्षल गढरी, गणेश चावरे, घनश्याम पाटील, संदीप सोनवणे, गोकुळ सोनवणे, विशाल थोरात, प्रशांत पाटील, कल्पना गढरी, सूनंदा चावरे, लता थोरात, अनुसाया पाटील,सरला पाटील, सुमन ,कल्पना चावरे, अल्का चावरे, रेखा पाटील ,स्वाती पाटील,मंगल आहिरे,मीना सोनवणे आदी महिला उपस्थित होते.