अमळनेरात शहीद जवानांना मानवंदना

अमळनेर – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । येथील जीत स्टुडिओच्या माध्यमातून पुलवामा येथे शहीद झालेल्या जवानांना अभिवादन करून शहरातील पोलीस मैदानावर देशभक्तीपर गीताचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

शहरात उभारण्यात आलेल्या शहीद स्मारकाला पुष्पचक्र उपस्थित अमळनेर पोलीस निरीक्षक जयपाल हिरे यांच्या हस्ते वाहून सलामी देण्यात आली.माजी आमदार स्मिताताई वाघ, माजी नगराध्यक्षा जयश्री पाटील व निवृत्त सैनिक जवानांनी मेणबत्ती लावून देश भक्तीपर घोषणा देऊन परिसर दणाणून सोडले. याप्रसंगी पुलवामा घटनेला उजाळा म्हणून त्या घटनेचा नाट्य रुपात सादरीकरण करण्यात आले. हे नाट्य पाहून उपस्थितांच्या अंगाला शहारे आल्याचा अनुभव आला. पुलवामा घटनेत शहीद झालेल्या जवानांना परिसरातील अनेक गायकांनी आपल्या सुमधुर आवाजात देश भक्ती पर गीत गाऊन मांवनदना दिली. रणजित शिंदे यांनी सूत्रसंचालन करतानां शहीद जवानांच्या कर्तुत्वाला उजाळा देत देशासाठी मौल्यवान जीव अर्पण करणाऱ्या जवानांना शब्दरुपी मानवंदना दिली व तरुणांना सैन्यात भरती होण्यास प्रवृत्त केले व उपस्थितां मध्ये देश भक्तीपर चेतना निर्माण केली. सदर कार्यक्रमाचे आयोजन करते जितू स्टुडिओ चे संचालक जितेश संदाणशिव यांच्या संकल्पनेचा उपस्थित मान्यवरांनी भरभरून कौतुक केले. असे कार्यक्रम तरुण पिढीला प्रेरणादायी ठरणारे असल्याचे उपस्थित अनेक नागरिकांनी मत प्रकट केले.

कार्यक्रमाला उपस्थित सैन्य दलातील सेवा निवृत्त इन्स्पेक्टर शिवाजी पाटील,हवालदार विनोद बिर्हाडे,सुभेदार शशिकांत वाघ,हवालदार एल बी बोडरे,सब इन्स्पेक्टर विजय शिसोदे, हवालदार ईश्वर चौधरी, हवालदार दिनेश सपकाळे, हवालदार आत्माराम बडगुजर, प्रल्हाद मोरे,विजय सूर्यवंशी,सुभेदार अभिमन्यू जाधव,हवालदार धनराज पाटील, हवालदार विवेक पाटील, हवालदार विजय सूर्यवंशी, हवालदार राजेंद्र जाधव आदीचें अनमोल मार्गदर्शन लाभले.

 

Protected Content