चाळीसगाव (प्रतिनिधी) पूलवामा येथे झालेल्या अतिरेकी हल्यात शहीद झालेल्या जवानांना शुक्रवारी श्रध्दांजली अर्पण करण्यात आली. या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य मिलींद बिल्दीकर यांनी अतिरेक्यांनी केलेल्या भ्याड हल्याचा तीव्र निषेध केला.
आज शहीद जवानांच्या कुटुंबियांवरच नव्हे तर संपूर्ण भारतावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. हा हल्ला प्रत्येक नागरिकाच्या मनाला इजा पोहचवणारा असून सबधीत दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी अपेक्षा यावेळी व्यक्त करण्यात आली.