Home Cities चोपडा अहमद पटेल यांना चोपडा काँग्रेसतर्फे श्रध्दांजली

अहमद पटेल यांना चोपडा काँग्रेसतर्फे श्रध्दांजली

0
32

चोपडा प्रतिनिधी । काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते खासदार अहमद पटेल यांचे आज निधन झाल्याने चोपडा शहर आणि तालुका काँग्रेस तर्फे भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात आली. 

आज दि. 25  नोव्हेंबर रोजी जनशिक्षण चोपडा येथे पक्ष कार्यकर्त्यांसमोर तालुकाध्यक्ष राजाराम पाटील यांनी स्व. पटेल यांच्या कार्याचा गौरव केला. पटेल हे अत्यंत मुत्सद्दी, निष्ठावान व सोनियाजींचे प्रमुख सल्लागार होते. या शब्दांत त्यांनी श्रध्दांजली अर्पण केली. शहर अध्यक्ष के. डी. चौधरी तालुका अध्यक्ष राजाराम पाटील यांनी स्व. पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण केला. यावेळी डॉ. अकबर पिंजारी, ऊपाध्यक्ष अॅड. एस. डी. पाटील, सचिव ईलियास पटेल, युवक काँग्रेस अध्यक्ष किरण सोनवणे, किसान सेल अध्यक्ष शशिकांत साळुंखे, जे. सी. पाटील, ऊपाध्यक्ष मेहमूद अली सैय्यद, शेख आरिफ शेख सिद्दीकी, प्रदीप सोनवणे, रमाकांत अमृत सोनवणे,  मार्केट कमिटीचे उपसभापती नंदकिशोर सांगोरे, सूतगिरणीचे संचालक राजेंद्र भास्करराव पाटील, रवींद्र कुराडकर, विकास भदाणे, सूर्यकांत के. चौधरी, गोपीचंद रघुनाथ चौधरी, आदि मान्यवरांनी स्व. पटेल यांच्या प्रतिमेला पुष्पांजली अर्पण करून अभिवादन केले.

 


Protected Content

Play sound