वार्डनकडून आदिवासी विद्यार्थ्याला मारहाण; शाळा प्रशासनावर कारवाई करा !

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिरपूर तालुक्यातील चोपडा फाट्याजवळ एस. आर. बी. इंटरनेशनल शाळेत जितेंद्र करचंद पावरा रा. जगदिशपाडा (खंबाळे) हा वि‌द्यार्थी इ. ९ वीत शिकत असुन, शनिवार रात्री १० वाजेच्या सुमारास सदर वि‌द्यार्थ्यास मनोज देवरे नामक वार्डनने अमानुषपणे जबर मारहाण केली. या मारहाणीत वि‌द्यार्थी हा गंभीर जखमी झाला आणि सध्या त्यास गंभीर अवस्धेत धुळे येथील खाजगी सिद्‌धेश्वर हॉस्पिटल दाखल केले असून, वि‌द्यार्थी जगण्याची झुंज देत आहे .

पालकांच्या तक्रारीनुसार दिनांक १४ सप्टेंबर रोजी शनिवारी रात्री ११ वाजेच्या सुमारास शाळेतून फोन आला की, जितेंद्र पावरा हा वि‌द्यार्थी शाळेच्या मुख्य इमारतीच्या गेटसमोर अत्यंत गंभीर जखमी होवून, बेशुद्ध अवस्थेत पडलेला आढळला त्याला दवाखान्यात नेत आहोत अशी माहिती फोन‌द्वारे मिळाली. सध्या वि‌द्यार्थी आयसीयुत उपचार घेत आहे. परंतु मारहाण करणारे मनोज देवरे व शाळा प्रशासनावर कोणतीही कायदेशीर कारवाई अ‌द्याप झालेली नाही. तरी महोदयांना विनंती की, आदिवासी विद्यार्थ्याला बेदम मारहाण करणारे मनोज देवरे व एस. आर. बी. इंटरनेशनलचे शाळा संचालक व प्रशासनावर एट्रॉसिटी व अन्य गंभीर कलमांखाली गुन्हा नोंद होवून तात्काळ अटक करण्यात यावी. अन्यथा संघटनेच्या वतीने येत्या ४ते ५ दिवसात उपविभागीय पोलीस अधिकारी कार्यालय, शिरपूर येथे तीव्र आंदोलन केले जाईल.

आदिवासी जनता दलाचे महाराष्ट्र प्रदेश कार्याध्यक्ष राजकुमार पावरा, अखिल भारतीय आदिवासी विकास परिषदेचे महाराष्ट्र प्रदेश युवा महासचिव ॲड.दारासिंग पावरा, आदिवासी जनता दलाचे शिरपूर तालुकाध्यक्ष विजय पावरा, करण पावरा, दिनेश पावरा, रमका पावरा, यशवंत पावरा, मुर्शा पावरा, दिलीप पावरा, सुनील पावरा, विजय पावरा आदि उपस्थित होते.

Protected Content