गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुजींच्या समवेत वृक्षारोपणाचा योग – आ.चिमणराव पाटील
पारोळा प्रतिनिधी । मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या वाढदिवसानिमित्त राज्य शिक्षक सेनेचा प्रेरणा दिवस वृक्षारोपणाचा पंधरवाडा हा उपक्रम राबविण्यात येत आहे. त्यानिमित्ताने आज गटसाधान केंद्राच्या आवारात आमदार चिमणराव पाटील यांच्याहस्ते वृक्षारोपण केले.
आ. पाटील म्हणाले की, गुरुपौर्णिमेच्या दिवशी गुरुजींच्या समवेत मुख्यमंत्री उध्दव ठाकरे च्या वाढदिवसाच्या निमित्ताने वृक्षारोपणाचा योग आला. याचा मनस्वी आनंद झाला असल्याचे सांगितले. यावेळी पारोळा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी एन.आर.पाटील, गटशिक्षणाधिकारी कविता सुर्वे, शिक्षण विस्तार अधिकारी सी.एम.चौधरी, शिक्षक सेना प्राथमिक जिल्हाध्यक्ष नरेंद्र सपकाळे, माध्यमिक जिल्हाध्यक्ष नंदकुमार पाटील, जिल्हा सरचिटणिस नाना पाटील, तालुकाध्यक्ष अनिल चौधरी, जिल्हा उपाध्यक्ष सुनिल चौधरी, निलेश पाटील, जळगाव तालुकाध्यक्ष राजू पाटील, तालुका उपाध्यक्ष नाना मराठे, तालुका कोषाध्यक्ष ईश्वर धोबी, योगेश चौधरी, राजेंद्र पाटील, डी.एम.सोनवणे, सचिन देशमुख, गिरीष वाणी, आण्णा चौधरी, सुनिल जाधव, रविंद्र पाटील, विशेष शिक्षक, मोबाईल टिचर्स, गटसाधन कर्मचारी सुत्रसंचालन अनिल चौधरी व आभार नंदकुमार पाटील यांनी व्यक्त केले.