जळगाव प्रतिनिधी । शहरातील मेहरुण परिसरातील जय दुर्गा माध्यमिक विद्यालयात महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्या हस्ते प्रातिनिधिक वृक्षारोपण करण्यात आले.
याचवेळी ‘कोरोना-19’च्या महामारीत नेरीनाका स्मशानभूमीत अहोरात्र मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्या धनराज सपकाळे, पंढरीनाथ बिर्हाडे, काशिनाथ बिर्हाडे, राजेंद्र कोल्हे, महेंद्र पाटील व कृष्णा पाटील आणि बेवारस मृतदेहांवर अंत्यसंस्कार करणार्या मू. जे. महाविद्यालयातील विद्यार्थी विकास वाघ, मुकेश पाटील, मुकेश सावकारे, कृष्णा साळवे, करण मालकर या कोरोनायोद्ध्यांचा रुमाल व पुष्पगुच्छ, त्याचप्रमाणे निसर्ग पर्यावरण सखी मंचाच्या उत्कृष्ट कार्य करणार्या वैशाली पाटील, अरुणा उदावंत, मीनाक्षी वाणी यांचा विद्यालयातर्फे महापौर जयश्री सुनिल महाजन यांच्याहस्ते तुळस रोपे, कुंड्या देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी निसर्ग पर्यावरण मंडळाचे शहराध्यक्ष नेहा संतोष जगताप कार्याध्यक्षा मनीषा पाटील, नाना पाटील, रघुनाथ सोनवणे, , छाया पाटील, सुचिता पाटील, मनीषा शिरसाठ, वंदना कोष्टी, ज्योती राणे, जयश्री पाटील, अलका बागूल उपस्थित होते.