Home Cities एरंडोल एरंडोलला विविध संघटनांच्या वतीने वृक्षारोपण

एरंडोलला विविध संघटनांच्या वतीने वृक्षारोपण

6a509508 6a4c 41a3 90f0 22d3ec0f6185
6a509508 6a4c 41a3 90f0 22d3ec0f6185

6a509508 6a4c 41a3 90f0 22d3ec0f6185
 

एरंडोल (प्रतिनिधी) शहरात विविध संघटनांच्या वतीने नुकताच वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी वृक्ष रोपणासह वृक्ष संगोपनाची जबाबदारी देखील घेण्यात आली.

 

अंकित सुधीर काबराच्या वाढदिवसानिमित्त वृक्षारोपण

 

तालुका मेडीकल असोसिएशनचे अध्यक्ष डॉ.सुधीर काबरा व राखी काबरा यांचा मुलगा अंकित सुधीर काबराच्या वाढदिवसानिमित्त एरंडोल येथील ग्रामीण रुग्णालयाच्या आवारात वृक्षारोपण व रुग्णाना फळ वाटप करण्यात आले. यावेळी एरंडोल तालुका मेडिकल असोसिएनचे अध्यक्ष डॉ सुधीर काबरा, नगराध्यक्ष रमेशसिंग परदेशी , प्रांतअधिकारी विनय गोसावी, तहसिलदार अर्चना खेतमाळीस , माजी नगराध्यक्ष किशोर निंबाळकर , उपनगराध्य नितिन महाजन उद्याेजक संजय काबरा राष्ट्रवादी तालुका अध्यक्ष प्रा.मनोज पाटील, मनसे तालुका अध्यक्ष विशाल सोनार, उद्येाजक डॉ राजेंद्र चौधरी ,डॉ राहुल वाघ, डॉ गितांजली ठाकुर ,डॉ शेखर पाटील ,डॉ पिगळे, डॉ किरण पाटील, योगेश काबरा,आरती ठाकुर,कुंदन ठाकुर व ग्रॅामिण रुग्णालयाचे कर्मचारी हजर होते.

 

सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कुल व ट्री फाऊंडेशनतर्फे वृक्षारोपण

 

एरंडोल येथील धरणगाव रस्त्यावरील इंग्लिश मिडीयम स्कुल व ट्री फाउंडेशनतर्फे शाळेचे संस्थापक अध्यक्ष विजय महाजन व फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय शिंदे यांनी ५० वृक्ष लावून संगोपनाची जबाबदारी घेतली. यावेळी सावित्रीबाई फुले इंग्लिश मिडीयम स्कुलचे संस्थापक अध्यक्ष विजय महाजन,ट्री फाऊंडेशनचे अध्यक्ष संजय शिंदे, शकुंतला पाटील ,सचिव स्वाती शिंदे,सहसचिव मिनाक्षी पाटील,जगदीश साळी,शोभना साळी,डी. एस.पाटील,पंकज पाटील,शारदा पाटील,राहुल शिंपी,जयश्री शिंपी,किशोरी पाटील,भुवन पाटील आदी उपस्थित होते.


Protected Content

Play sound