जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामानंद घाट परिसरात माजी उपमहापौर आश्विन सोनवणे यांच्याहस्ते गुरूवारी २५ जुलै रोजी सकाळी १० वाजता वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला. याप्रसंगी श्रीधर नगरातील योगशिक्षक सुनिल गुरव यांच्यासह ग्रामस्थ व ५० झाडे लावण्याच्या उपक्रमासाठी उपस्थिती होती.
योगशिक्षक सुनिल गुरव यांच्यासह परिसरातील नागरीकांच्या संकल्पनेतून गेल्या काही वर्षांपासून दरवर्षी वृक्षारोपणाचा उपक्रम राबविला जातो. आजवर ३०० हून अधिक झाडांचे संगोपन केले आहे. शिवाय याच परिसरात राहणारे जगन्नाथ निंभोरे, किरण दहाड यांच्यासह माजी उपमहापौर आश्विन सोनवणे यांच्याहस्ते यांच्या सहकार्याने वृक्षांचे संवर्धन केले जात आहे.
कार्यक्रम यशस्वितेसाठी भाजपचे सरचिटणीस ज्योती निंभोर, स्थानिक रहिवाशी मोहन महाजन, चिंधू नारखेडे, रत्नदिप टेंट हाऊसचे संचालक महेश खडके, वाघ नगर व जिजाऊ नगरातील वृक्षप्रेमी विजयेंद्र साळुंखे, योगेश पाटील, मनोज साळवेकर, प्रभाकर बोरसे, रेणुका हिंगे, पूर्वी सोनी, अश्विनी बिऱ्हाडे, भागवत सपकाळ हे परिश्रम घेत आहे. यावेळी माजी उपमहापौर सुनिल गुरव यांचा सत्कार योग शिक्षक सुनील गुरव, मोहन महाजन, ज्योती निंभोरे यांच्याहस्ते करण्यात आला. वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध असल्यास वृक्षरोपणासाठी रामानंद घाट येथील जगन्नाथ निंभोरे यांच्याशी संपर्क साधावा असे आवाहन योगशिक्षक सुनिल गुरव यांनी केले आहे. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन योग शिक्षक सुनील गुरव यांनी केले.