यावल प्रतिनिधी । येथे काही एक कारण नसतांना जीवंत डेरेदार वृक्षांची कत्तल करण्यात येत असल्याने ही वृक्षतोड तातडीने थांबविण्याची मागणी पर्यावरण प्रेमींनी केली आहे.
याबाबत वृत्त असे की, शहरातील नगर परिषदच्या माध्यमातुन विस्तारीत कार्यक्षेत्रात गेल्या काही दिवसापासुन विविध विकासकामे करण्यात येत आहेत. यात तिरुपती नगर परिसरात तिन चार दिवसांपासुन क्राँकीट गटारीचे कामे करण्यात येत आहे. यात रस्त्याच्या कडेला असणार्या जिवंत वृक्षांची खुलेआम कत्तल करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. प्रकारे बेकायद्याशीर जिवंत वृक्षांची कत्तल करण्यात येत असुन या वृक्षतोडीच्या गैरकृत्याची पर्यावरण प्रेमीकंडुन तिव्र शब्दात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.
यावल नगर परिषदचे मुख्यधिकारी, व नगराध्यक्ष यांनी या विषयी गांर्भीयाने लक्ष घालुन या वृक्षतोडीच्या गोंधळास कारणीभूत असलेल्यांची तात्काळ चौकशी करून या प्रकरणातील दोषीवर गुन्हा दाखल करावा अशी मागणी परिसरातील पर्यावरण प्रेमीकंडुन करण्यात येत आहे. एकीकडे शासन वृक्ष लागवडीला प्रोत्साहन देत असतांना या प्रकारची वृक्षतोड ही चिंताजनक असून याबाबत कार्यवाही होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.