पारोळा (प्रतिनिधी) जळगावहून मुंबईच्या दिशेने जाणारी ट्रॅव्हल्स ओव्हर टेक करण्याच्या नादात विचखेडे गावाजवळ पलटी होत एक महिला जागीच ठार तर अन्य ४० प्रवाशी जखमी झाल्याची घटना शुक्रवारी रात्री उशिरा घडलीय.
या संदर्भात अधिक असे की, जळगाव येथून सिंडीकेट प्राईड लक्झरी (क्र.एमपी.३० पी.०२७२) ही शुक्रवारी रात्री मुंबईला जायला निघाली. रात्री साधारण साडेअकरा वाजेच्या सुमारास विचखेडे येथे ओव्हरटेक करण्याच्या नादात चालकाचा ताबा सुटला आणि लक्झरी सरळ रस्त्याच्या कडेला असलेल्या गड्ड्यात जाऊन पडली. अपघात एवढा भीषण होता की, लक्झरी दोन वेळेस पलटी झाली. त्यामुळे सीमा भिकन सूर्यवंशी (रा.ठाणे) ही प्रवाशी महिला जागीच ठार झाली. तर अन्य साधारण ४० प्रवाशी जखमी झालेय. या अपघातामुळे काही वेळ वाहतूक विस्कळीत झाली होती. दरम्यान, लोकांनी मदत करत जखमी प्रवाशांना तात्काळ रुग्णालयात दाखल करण्यास मदत केली.