समारंभात विनापरवाना डिजे वाजविणे पडले महागात

डिजे मालकाविरूध्द गुन्हे दाखल

रावेर – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | लग्न समारंभात विना परवाना डीजे वाजविल्या प्रकरणी रावेर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आल्याने डिजे चालकांमध्ये एकच खळबळ उडाली आहे.

रावेर येथील राजे संभाजीनगर भागात सोमवार, दि.९ मे रोजी खाजगी समारंभ होता. यावेळी विनापरवाना वेळेपेक्षा जास्त वेळ डिजे वाजविल्याबद्दल डिजे मालक सचिन अर्जुन भोई, डि.जे चालक भूषण केशव भोई, डि.जे.वाहन चालक राहुल शिवलाल भोई सर्व रा. भोईवाडा रावेर याचे विरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

तर दुसऱ्या घटनेत तालुक्यातील रसलपूर येथे बुधवार, दि.११ मे रोजी खाजगी  समारंभात डि.जे.मालक सोनू मदन हर्दे रा.रावेर, डि.जे चालक कन्हैया संतोष महाजन रा.रसलपूर यांनी विनापरवाना वेळेपेक्षा जास्त आणि विनापरवाना डिजे वाजविल्याबद्दल त्यांच्या गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या पथकाने केली कारवाई –

रावेर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक शितलकुमार नाईक, सहाय्यक फौजदार राजेंद्र करोडपती, पोहेकाँ.बिजू जावरे, पोलीस नाईक पुरुषोत्तम पाटील या पथकाने ही धडक कारवाई करून डीजे गाडी ताब्यात घेतली आहे. याबाबत रावेर पोलीस स्टेशनमध्ये दोन वेगवेगळे गुन्हे दाखल करण्यात आले असून सहाय्यक फौजदार ईस्माइल शेख, पोलीस नाईक जगदीश पाटील करित आहे.

आम्हाला विविध सोशल मंचावर फॉलो करा

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

error: Content is protected !!