जळगाव प्रतिनिधी । येथील लोक शिक्षण मंडळ संचलित स्वातंत्र्य सैनिक ज.सु. खडके प्राथमिक विद्यामंदिरात नुकतीच परिवहन समितीची सभा घेण्यात आली.
सुत्रांनी दिलेली माहिती अशी की, परिवहन समिती सभेत शहर वाहतूक शाखेच्या मेघना जोशी आणि मोटार वाहन निरिक्षक (RTO कार्यालय जळगाव) पांडुरंग आव्हाड यांनी रिक्षाचालक व पालक तसेच शाळा व्यवस्थापन यांच्या जबाबदाऱ्या निश्चित करून देत रिक्षाचालकांना नियमांचे पालन करण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी शाळा समिती सदस्य राजशेखर चौधरी, अध्यक्षस्थानी एस.डी.खडके, पा.शि.संघ कृष्णराव पवार, रिक्षा चालक संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप सपकाळे, बालविहार मुख्याध्यापिका शालिनी भारंबे, संजय पाटिल यांची प्रमुख उपस्थिती होती. सर्वांचे स्वागत मुख्याध्यापिका निर्मला चौधरी, परिवहन समिती प्रमुख वंदना धुमाळ, सहाय्यक सुनील पवार यांनी केले आहे. सभेस शाळेतील सर्व रिक्षा चालक रिक्षाने येणारे विद्यार्थ्यांचे पालक यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती. सभेचे सूत्रसंचालन सुनील पवार यांनी व आभार प्रदर्शन वंदना धुमाळ यांनी केले आहे.