Home Cities जळगाव जिल्ह्यातील नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; एसपींनी काढले आदेश

जिल्ह्यातील नऊ पोलीस निरीक्षकांच्या बदल्या; एसपींनी काढले आदेश


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्ह्यात बदलून आलेल्यांसह प्रभारी म्हणून नियुक्ती देण्यात आलेल्या ९ पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश शनिवारी ५ जुलै रोजी  पोलीस अधीक्षकांनी काढले. त्यांना तात्काळ नवीन पदस्थापना झालेल्या ठिकाणी हजर होण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले आहेत.

 

गेल्या काही महिन्यांपुर्वी जिल्ह्यात पोलीस निरीक्षकांच्या बदलीचे आदेश निघाल्याने जळगावात नवीन अधिकारी आले होते. परंतु पदस्थापना न झाल्याने त्यांची नियंत्रण कक्षात नियुक्ती करण्यात आली होती. दरम्यान, शनिवारी नियंत्रण कक्षासह पोलीस ठाण्यात प्रभारी म्हणून नियुक्ती दिलेल्या ९ पोलीस निरीक्षकांच्या बदलचे आदेश जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी काढले.

 

यांनी झाली बदली

यामध्ये नियंत्रण कक्षातील पोनि सचिन सानप यांची पहुर पो. ठाणे., विशाल जयस्वाल यांची जिल्हापेठ पो. ठाणे, बबन जगताप यांची सायबर पो. ठाणे, सुनिल पवार यांची पारोळा पो. ठाणे, अनिल भवारी यांची जळगाव शहर पो. ठाणे तर जिल्हापेठचे प्रभारी पो. नि. बबन आव्हाड यांची भुसावळ बाजारपेठ, जिविशा शाखेतील रंगनाथ धारबळे यांची शनिपेठ पो. ठाणे, भुसावळ तालुक्याचे पोनि. विलास शेंडे यांची जिविशा तर वाचक शाखेतील सपोनि रुपाली चव्हाण यांची भुसावळ शहर वाहतुक शाखेत बदली करण्यात आली आहे.


Protected Content

Play sound