अमळनेर प्रतिनिधी । लोकसभा निवडणुकीसाठी मतदान अधिकारी, यांनी अमळनेर येथील राजसारथी व पोलीस हाँलमध्ये निवडणूक प्रशासनामार्फत ईव्हीएम व्हीव्हीपॅट यंत्राबाबत प्रशिक्षण देण्यात आले. हे प्रशिक्षण निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी सिमा अहीरे व तहसीलदार ज्योती देवरे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरु आहे. ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र हाताळणीचे प्रशिक्षण कार्यक्रम पार पङला. तलाठी वाल्मिक पाटील, पिंटू चव्हाण यांनी राजसारथी हाँलमध्ये तर पोलीस हाँलमध्ये गौरव शिरसाट यांनी प्रशिक्षण दिले. तर फिरते पथकात प्रशिक्षण तलाठी व्हि.पी.पाटील, एस.एम.महाजन, एस.एम कोळी, एन.जी.कोचुरे देत आहे.
कर्मचार्यांना ईव्हीएम, व्हीव्हीपॅट यंत्र कसे हाताळावे. प्रात्यक्षिक करुन सविस्तर मार्गदर्शन केले. अमळनेर तालुक्यातील माध्यमिक, प्राथमिक, सर्व शासकीय कार्यालयातील अधिकारी, कर्मचारी यांना निवङणुक प्रशासनामार्फत प्रशिक्षण देण्यात आले. प्रशिक्षणाच्या संदर्भामध्ये निवडणूक निर्णय अधिकारी यांनी योग्य नियोजन करून एक कार्यक्रम आखला असून त्यामध्ये व्हिव्हिपँट, कंट्रोल युनिट बॅलेट युनिट सीआरसी कसे करावे या संदर्भात कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्याचं काम युद्धपातळीवर सुरू आहे.
पहा । ईव्हीएम, व्हीव्हीपॅटबाबत मार्गदर्शन करतांना अधिकारी