यावल- लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने येथे प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजने अंतर्गत विविध जिल्हा परिषदच्या शाळांमध्ये कार्यरत असलेल्या तालुकास्तरिय शालेय पोषण आहार स्वयंपाकी आणि मदतनिस यांच्या साठीचे एकदिवसीय प्रशिक्षण शिबीराचे आयोजन करण्यात आले . यावल येथील साने गुरूजी माध्यमीक व उच्च माध्यमिक विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या प्रधानमंत्री शक्ती निर्माण योजने अंतर्गत प्रशिक्षण शिबीरास जळगाव येथील श्री एनालीटीकल टेस्टिंग अॅण्ड रिर्चस लायबरी या स्वयंसेवी संस्थतेच्या वतीने अन्न व सुरक्षा व मानदे कायदेनुसार यावल तालुक्यातील जिल्हा परिषद च्या२०२ शाळामधील ४००ऊन अधिक कर्मचाऱ्यांनी यात सहभाग घेतला, यावेळी यावल पंचायत समितीचे गट शिक्षणधिकारी विश्वनाथ चावदस धनके,यावल तालुका पोषण आहार अधिक्षक सचिन मगर, अनिकेत सर यांनी उपस्थित पोषण आहार स्वयंपाकी व मदतनिस यांना मार्गदर्शन केले .
या शिबिरास सर्व केन्द्र प्रमुख विविध शैक्षणिक विभागाचे मान्यवर यांच्यासह साने गुरुजी विद्यालयाचे शिक्षक व शिक्षिका आदी प्रामुख्याने या पोषण आहार स्वयंपाकी व मदतनिस यांच्या एकदिवशीय प्रशिक्षण शिबिरास उपस्थित होते .