जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पुणे येथील बालेवाडी येथे क्रीडा प्रबोधिनीत फुटबॉल स्पर्धेसाठी प्रशिक्षण व संघ उभारणी करण्यासाठी विभागनिहाय निवड चाचणी नाशिक येथे होत आहे. या निवड चाचणीत जिल्ह्यातील खेळाडूंनी सहभाग नोंदवावा. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलींद दिक्षीत प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.
गुरूवार, दि. 16 जून रोजी सायंकाळी दिलेल्या दिलेल्या प्रसिध्दीपत्रकात कळविले आहे की, “पुणे येथील शिवछत्रपती क्रीडा संकुल, बालेवाडी येथील क्रीडाप्रबोधिनीत फुटबॉल या खेळाच्या प्रशिक्षण व संघ उभारणी करणेकरीता नव्याने खेळाडूंची भरती करण्यासाठी वयोगट 14 ते 16 वर्षातील खेळाडूंच्या विभागनिहाय निवड चाचणीचे आयोजन करण्यात येणार आहे.
नाशिक विभागीय निवड चाचणीचे आयोजन दि, २१ ते २२ जून रोजी पंचवटी येथील विभागीय क्रीडा संकुल येथे करण्यात आले आहे. या निवड चाचणीत जन्मतारिख, खेळाडूंची उंची, शारिरीक क्षमता, कौशल्य चाचणी, खेळातील कामगिरी या चाचण्या होणार असून सहभागी होणाऱ्या फक्त खेळाडूंची निवास व्यवस्था करण्यात येणार आहे. प्रवास व भोजन खर्च स्वतः करावयाचा आहे.
जिल्ह्यातील सदर चाचण्यासाठी सर्व खेळाडूंनी नाशिक येथे जातांना जन्मदाखला आवश्यक असून व क्रीडा कामगिरीबाबत कागदपत्रे असल्यास सोबत घेवून जावे. असे आवाहन जिल्हा क्रीडा अधिकारी मिलिंद दिक्षित यांनी एका प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.