Home Cities धरणगाव पालकमंत्र्यांना बंधूशोक : कैलास रघुनाथ पाटील यांचे निधन

पालकमंत्र्यांना बंधूशोक : कैलास रघुनाथ पाटील यांचे निधन

0
115

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज पहाटे निधन झाले असून त्यांच्या पार्थिवावर आज अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राज्याचे पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे लहान बंधू कैलास रघुनाथ पाटील यांचे आज पहाटे साडेपाच वाजेच्या सुमारास अकस्मात निधन झाले. त्यांची अंत्ययात्रा आज दुपारी बारा वाजता पाळधी येथील राहत्या घरून निघणार आहे.

कैलासजी यांच्या अकाली मृत्यूमुळे पाटील कुटुंबावर वज्राघात झाला असून परिसरातून शोक संवेदना व्यक्त करण्यात येत आहेत. तर ना. गुलाबराव पाटील यांच्या समर्थकांनी पाळधी येथे धाव घेतली आहे.


Protected Content

Play sound