यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील नावरे येथील तरूणीने टोकाचे पाऊल उचलल्याने तिचा करूण अंत झाला आहे.
या संदर्भात पोलीस सुत्रांकडून मिळालेल्या माहिती अनुसार प्रणाली रामकृष्ण मेढे ( वय १८ वर्ष, राहणार नावरे, तालुका यावल ) या तरुणीने दिनांक २८ जुलै शुक्रवार रोजी दुपारी २ते ३ वाजेच्या सुमारास रोजी आपल्या राहत्या घरातील समोरच्या खोलीत छता असलेल्या झोक्यासाठी लावलेल्या लोखंडी कडीला साडीच्या सहाय्याने गळफास घेत आत्महत्या करीत आपली जिवन यात्रा संपवल्याची अत्यंत दुदैवी घटना घडली आहे.
या घटनेमुळे तिच्या कुटुंबाला मोठा धक्का बसला असून तिचा मृतदेह पाहून कुटुंबियांनी हंबरडा फोडला. या घटनेची खबर मरण पावलेल्या तरूणीचे वडील रामकृष्ण सुपडू मेढे यांनी दिल्याने यावल पोलीस ठाण्यात आक्समात मृत्युची नोंद करण्यात आली असुन, मयत हिच्या मृतदेहाचे शवविच्छेदन यावल ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी केले. तरूणीने आत्महत्या सारखे पाऊल का उचलंले हे मात्र स्पष्ट होवु शकले नाही . घटनेचा तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक फौजदार विजय पाचपोळे हे करीत आहेत.
दरम्यान, मयत प्रणालीच्या मृतदेहावर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले असून तिच्या करूण मृत्यूमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.