जळगाव प्रतिनिधी । बांभोरी येथील गिरणा पुलावर मध्यरात्रीनंतर दोन ट्रक समोरासमोर धडकल्याने वाहतुकीची कोंडी झाली असून अनेक वाहनधारकांना त्रास सहन करावा लागला.
आज रात्री सुमारे एक वाजेच्या सुमारास डब्ल्यू बी २३-१८६४ तसेच एमएच १५- ईजी ५२५६ या क्रमांकाच्या दोन ट्रकची गिरणा पुलावर समोरासमोर धडक झाली. यात दोन्ही ट्रकचे ड्रायव्हर गंभीर जखमी झाले. दरम्यान, पुलावर अपघात झाल्यामुळे दोन्ही बाजूंनी तीन ते चार किलोमीटरपर्यंत वाहनांच्या रांगा लागल्या. यामुळे आज सकाळी दहा वाजेपर्यंत अनेक वाहनधारकांचा त्रास सहन करावा लागला. शहराकडून शिव कॉलनीपर्यंत तर दुसर्या बाजूने विद्यापीठापर्यंत वाहनांची रांग दिसून आल्या.
पहा : अपघात आणि वाहतुक कोंडीबाबतचा व्हिडीओ.