Home क्राईम रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केल्याने वाहतूकीची कोंडी; एकावर गुन्हा दाखल !

रस्त्याच्या मधोमध गाडी उभी केल्याने वाहतूकीची कोंडी; एकावर गुन्हा दाखल !

0
129


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील स्वातंत्र्य चौक ते बहिणाबाई रस्त्याच्या दरम्यान एका वाहनचालकाने रस्त्याच्या मधोमध आपली चारचाकी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याने त्याच्याविरुद्ध जिल्हापेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्हापेठ पोलीस ठाण्याचे कर्मचारी ईश्वर खवडे, साहेबराव खैरनार आणि योगेश पाटील हे २५ एप्रिल रोजी त्यांच्या हद्दीत नियमित गस्त घालत होते. सकाळी सुमारे ११ वाजता, स्वातंत्र्य चौक ते बहिणाबाई रस्त्यावर त्यांना (एमएच १९, बीयू ४३९६) क्रमांकाची एक चारचाकी गाडी रस्त्याच्या अगदी मधोमध उभी असलेली दिसली. यामुळे या मार्गावर वाहतुकीची कोंडी झाली होती आणि इतर वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत होता.

गस्तीवरील पोलिसांनी तात्काळ गाडीजवळ जाऊन पाहणी केली आणि चालकाची विचारपूस केली. चालकाने त्याचे नाव जैसल निरव पिंपरिया (वय ३७, रा. यवतमाळ, हल्ली मुक्काम लिला रेसिडेंसी, वल्लभनगर) असे सांगितले. रस्त्याच्या मधोमध गाडी उभी करून वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याबद्दल पोलिसांनी जैसल पिंपरिया याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.


Protected Content

Play sound