चाळीसगाव (प्रतिनिधी)। शहरातून रात्रीच्यावेळी अवजड वाहतूकीची मोठ्या प्रमाणावर होत असल्याने त्यांच्यावर त्वरीत कारवाई करण्यात यावी अशी मागणी चाळीसगावकरांनी शहर वाहतूक शाखेकडे मागणी केली होती. त्या पार्श्वभूमीवर वाहतूक शाखेने 1 मार्चच्या मध्यरात्री रात्री सहायक पोलीस निरीक्षक सुरेश शिरसाट व त्यांच्या पथकाने अशा अवजड वाहनांवर दंडात्मक कारवाई केली. तसेच बायपास शहराच्या बाहेर असून अवजड वाहतूक शहरातून न करता बायपासचा वापर करावा अशा सुचना वाहनचालकांना दिल्या आहे.
शहरातून होणाऱ्या या अवजड वाहतुकीमुळे रात्रीच्या वेळेस मोठ्या प्रमाणावर अपघात झाल्याचेही प्रकार आहेत कारण रात्री ही वाहने भरधाव वेगाने जात असल्याने अंधारात बऱ्याच वेळा पादचारी व्यक्तींचे अपघात झालेले आहेत. तसेच शहरातील रस्त्यांना मोठ्या प्रमाणावर खड्डे देखील यामुळे पडलेत म्हणून ही अवजड वाहने शहरातून जाऊ नयेत अशा नागरिकांच्या तक्रारी आहेत, म्हणून वाहतूक शाखेने केलेल्या या कारवाईत ने काही प्रमाणात समाधान व्यक्त केले जात आहे.