यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जनजातीय गौरव दिवस व राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सव नंदुरबार येथे आदिवासी महोत्सवाचे उद्घाटन राज्यपाल विजय बैस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याहस्ते करण्यात आले. या आदिवासी महोत्सवात तडवी भिल जमातीचे पारंपारीक प्रदर्शन उत्साहात संपन्न झाले.
महाराष्ट्र शासन आदिवासी विकास विभाग, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय,यावल आयोजित आदिवासी सांस्कृतिक कला महोत्सव नंदुरबार येथे आदिवासी तडवी भिल जमातीच्या वतीने आदिवासी तडवी भिल पारंपरिक वन औषधी, खाद्य पदार्थ व हस्तकला प्रदर्शन” ठेवण्यात आलेले आहे. गेल्या दोन दिवसांपासून या स्टॉलला विविध मान्यवरांनी भेटी दिल्या. यात आदिवासी विकास मंत्री विजयकुमार गावीत, खासदार हिना गावीत, जि.प.अध्यक्ष नंदुरबार सुप्रिया गावीत यांच्या यांनी भेट तदिली.
याप्रसंगी आदिवासी विकास विभागाचे आयुक्त संदीप गोलाईत , यावल प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी अरूण पवार मा.धुळे एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे प्रकल्प अधिकारी प्रमोद पवार , यावल एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालयाचे सहा. प्रकल्प अधिकारी जावेद तडवी, नंदुरबार आदिवासी वसतीगृहाचे अधिक्षक मनोज जमशेर तडवी, यावल प्रकल्प कार्यालयाचे दस्तगीर तडवी, यावल प्रकल्प कार्यालयाचे जब्बार तडवी,जळगाव वसतीगृहातचे जुम्मा तडवी, आदिवासी तडवी भिल युवा कृती समितीचे युनुस तडवी, अशरफ तडवी, लुकमान तडवी, मुराद तडवी, आसीफ तडवी, सद्दाम तडवी, मुस्तुफा तडवी, महिला बचत गटाचे सकिना तडवी आदि उपस्थित होते.
आदिवासी महोत्सवात आदिवासी तडवी भिल जमातीच्या वतीने पारंपारिक हस्तकलेच्या वस्तू चाटू, बळगी, ठेसणी, खलबत्ता, रिळ, बाबूंचे टोपली, सुपडा व हस्तकला, चित्रकलेच्या विविध साहित्य व वस्तू खाद्यपदार्थात केळीचे वेफर्स आदि प्रदर्शन व विक्री करण्यात आली. महोत्सवासाठी एकात्मिक आदिवासी प्रकल्प कार्यालय यावल यांचे अधिकारी कर्मचारी व आदिवासी तडवी भिल युवा कृती समितीचे सदस्य यांनी परिश्रम घेतले.