जळगाव प्रतिनिधी । माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या शिष्टाईमुळे अखेर कृषी उत्पन्न बाजार समितीमधील व्यापार्यांनी आपला संप मागे घेतला आहे.
कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये नवीन व्यापारी संकुल उभारण्याच्या प्रश्नावरून गत काही दिवसांपासून सुरू असणारा अवरोध आज संपुष्टात आला आहे. माजी मंत्री सुरेशदादा जैन यांच्या निवासस्थानी व्यापार्यांची बैठक झाली. याप्रसंगी जैन यांनी ना. गिरीश महाजन व ना. गुलाबराव पाटील यांच्याशी चर्चा करून यशस्वी मध्यस्थी केली. यामुळे व्यापार्यांनी दुपारपासून संप मागे घेण्याचे जाहीर करून या वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. तर आता संबंधीत कंत्राटदार हा पाडलेली भिंत कधी उभी करून देणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.