Home राज्य व्यापारी महामंडळाचा आज देशव्यापी बंद

व्यापारी महामंडळाचा आज देशव्यापी बंद

0
28

मुंबई प्रतिनिधी । व्यापारी महामंडळाने आज पुलवामा येथील हल्ल्याचा निषेध म्हणून देशव्यापी बंदची हाक दिली आहे.

पुलवामा येथील हल्ल्याचा देशात सर्वत्र निषेध करण्यात येत आहे. या पार्श्‍वभूमिवर आज व्यापारी महामंडळाने देशव्यापी बंद पाळण्याची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्ये यामध्ये सहभागी होणार असल्याची माहिती अखिल भारतीय व्यापारी महासंघाने दिली आहे. या बंददरम्यान देशभरातील किरकोळ तसेच घाऊक बाजारपेठा बंद राहतील. तसेच, ठिकठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात येणार असून, यावेळी पाकिस्तान व चीनच्या प्रतिकात्मक वस्तूंचे दहन करण्यात येणार आहे. याशिवाय व्यापारी हुतात्मा जवानांच्या कुटुबीयांसाठी आर्थिक मदत जमा करणार आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound