धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | मालेगाव महानगरपालिका कर्मचाऱ्याला एमआयएमच्या माजी नगरसेवकासह त्याचे सहकाऱ्यांकडून मारहाण करून जातीवाचक शिवीगाळ केल्याचा प्रकार घडला आहे. या घटनेच्या निषेधार्थ धरणगाव येथील राष्ट्रीय ट्रेड युनियन काँग्रेस आणि धरणगाव सफाई कामगार यांच्यातर्फे मंगळवारी १८ मार्च रोजी दुपारी १२ वाजता धरणगाव तहसीलदार यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले आहे.
दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, मालेगाव महानगरपालिकेत १० मार्च रोजी महापालिका कर्मचारी अजय श्रावण चांगरे हे प्रभाग क्र. ४ येथे काम करीत असतांना एमआयएमचे माजी नगरसेवक अब्दुल मजीद व त्याच्या सोबत असलेले सहकारी व त्याचे नातेवाईक यांनी मारहाण केली आणि अर्वाच्य भाषेचा वापर करून जातीवाचक शिवीगाळ करून जीवेठार मारण्याची धमकी दिली. अश्या पैश्याचा माज आलेल्या नगरसेवक हा अनेकवेळी सफाई कर्मचाऱ्यांवर अत्याचार केलेला आहे तरीही प्रशासन ज्या पद्धतीने त्याची दखल घेतली पाहिजे ती घेतली नाही. त्याच्यावर मोका अंतर्गत कारवाई करून कठोर शिक्षा करावी की भविष्यात महाराष्ट्रामध्ये कोणत्याही सफाई कर्मचाऱ्याला अश्या प्रकारची वागणूक देणाऱ्याला वचक बसेल असे निवेदनात नमूद केले आहे.