गिरणा नदीतून वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले; तालुका पोलीसात गुन्हा दाखल

जळगाव – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । गिरणा नदीपात्रातून अवैधरित्या वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडले असून याप्रकरणी तालुका पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

जळगाव तालुक्यातील ङ्गुपनगरी शिवारातील गिरणा नदीपात्राजवळील स्मशानभूमीजवळी कच्च्या रस्त्यावरुन अवैधरित्या वाळूची वाहतुक करणारे ट्रॅक्टर तालुका पोलिसांनी पकडले. चालकाला वाळूची वाहतुक करण्यासाठी परवाना असल्याचे विचारले असता त्याच्याकडे कुठलाही परवाना आढळून आला नाही. पोलिसांना बघताच ट्रॅक्टर चालकाने ट्रॅक्टरसोडून पळून गेला. दरम्यान, पोलिसांनी वाळू वाहतुक करणारे ट्रॅक्टर पोलीस ठाण्यात जमा केले असून याप्रकरणी पोलिस कर्मचारी दीपक साहेबराव कोळी यांच्या फिर्यादीवरुन ट्रॅक्टर चालक व मालकाविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुशिल पाटील हे करीत आहे.

 

Protected Content