पाच किलोमीटर पाठलाग करून पकडले वाळूची अवैध वाहतूक करणारे ट्रॅक्टर

 

यावल, प्रतिनिधी । तालुक्यातील डांभुर्णी गावातुन वाळुची अवैध वाहतुक करणारे ट्रॅक्टर कारवाईच्या भीतीने ट्रॅक्टरचालक पळवून नेत असतांना महसूल पथकाच्या वाहनचालकाने सिने स्टाईल पकडल्याने विना परवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणाणले आहे. 

या संदर्भात मिळालेली माहीती अशी की,  आज दिनांक मंगळवार १६ मार्च रोजी सकाळी ५.३० वाजेच्पा सुमारास डांभुर्णी गावातुन गावाजवळच्या नाल्यात साठवण करून ठेवलेल्या अवैद्यरित्या ट्रॅक्टर वाहन क्रमांक एमएच १९ सियु९८०२यातुन कोळन्हावी येथील राहणार पिंताबर समाधान सोळुंके हे नायब तहसीलदार आर. के. पवार , फैजपुर मंडळातील तलाठी पी. पी. जावळे , आमोदे येथील तलाठी एम. पी. खुर्दा, पोलीस कर्मचारी भुषण चव्हाण, तहसीलदारांचे वाहन चालक हिरामण सावळे यांनी विनापरवाना वाळुची वाहतुक करतांना ताब्यात घेतले.  या विनापरवाना वाळुची वाहतुक करणाऱ्यावर दंडात्मक कारवाई करण्यात येणार असल्याची माहिती निवासी नायब तहसीलदार आर. के. पवार यांनी दिली.  महसुलतर्फे वाळु माफीयाच्या विरुद्ध सुरू केलेल्या मोहीमेअंतर्गत आठ दिवसातील पाचवी कारवाई झाल्याने वाळु माफीयावर चांगला वचक बसल्याचे दिसुन येत आहे. यावेळी महसुलच्या पथकाने घटनास्थळी जावुन वाळुचा पंचनामा करून ट्रॅक्टर वाहन जमा केले आहे. वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकांने कारवाईच्या भितीने वाहन घेवुन पळुन जाण्याचा देखील प्रयत्न केला. मात्र महसुलचे वाहन चालक हिरामण साळवे यांनी समयसूचकता बाळगुन वाळुची वाहतुक करणाऱ्या ट्रॅक्टरचा अत्यंत खडतर मार्गावरून सुमारे पाच किलोमिटर पाठलाग करून पकडण्यात यश मिळवले .

 

Protected Content