वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

रामानंदनगर पोलिसात गुन्हा दाखल

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी| शहरातील पिंप्राळारोड परिसरातून अवैधरित्या वाळूची चोरटी वाहतूक करणारे ट्रॅक्टर तलाठी यांनी पकडले आहे. याप्रकरणी शुक्रवार ८ मार्च रोजी दुपारी २ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भात अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील पिंप्राळा रोड परिसरातून वाळूची चोरटी वाहतूक होत असल्याची माहिती महसूल पथकाला मिळाली. त्यानुसार तलाठी संदीप डोभाळ यांनी आणि त्यांच्या पथकाने शुक्रवार ८ मार्च रोजी सकाळी ११ वाजता कारवाई केली. यावेळी विना क्रमांकाचे ट्रॅक्टर पकडले. महसूल पथकाने वाळूचे ट्रॅक्टर जमा केले आहे. याप्रकरणी दुपारी २ वाजता तलाठी संदीप डोभाळ यांनी दिलेल्या फिर्यादीवरून सुभाष पांडुरंग थोरात रा. सावखेडा ता. जळगाव आणि सादिक बशीर शेख रा. मेहरून, जळगाव या दोघांविरोधात रामानंदनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Protected Content