पहूर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाण्याच्या टाक्या वाहून नेणाऱ्या ट्रॅक्टरची ट्रॉली उलटल्याने अपघात झाल्याची घटना गुरूवारी सकाळी ११ वाजता पहूर गावात घडली आहे. या सुदैवाने वृध्द महिला थोडक्यात बचावली आहे.
पहूर बसस्थानक परिसरात वाहतुकीची नेहमीच कोंडी होत असते. बेशिस्तपणे लावलेली वाहने आणि राष्ट्रीय महामार्गाचे रखडलेले काम यामुळे हा परिसर अपघात प्रवण क्षेत्र बनलेला आहे. गुरूवारी ४ जुलै रोजी सकाळी ११ वाजता ट्रॅक्टरद्वारे पाण्याच्या टाक्या नेल्या जात होते. त्यावेळी वळणावर ट्रॅक्टर जात असतांना अचानक ट्रॅक्टरची ट्रॉली पलटी झाली. यात ट्रॅक्टरवरील टाक्या कोसळल्या. यावेळी तेथून जाणाऱ्या नर्मदाबाई भागवत घोंगडे या भाजीपाला विक्री करणाऱ्या वृद्धा बालबाल बचावल्या. ट्रॉली उलटल्याने टाक्यांमधील पाणी आजूबाजूच्या दुकानांमध्ये शिरले. अपघात होताच बसस्थानक परिसरातील लोक धावून आले. त्यांनी ट्रॉली पूर्ववत करण्यासाठी सहकार्य केले. महामार्गावर पार्क केली जाणारी वाहने इतरत्र हलविण्यात यावी अशी मागणी स्थानिक व्यावसायिकांनी केली आहे.