Home Cities एरंडोल खडके बुद्रुक येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

खडके बुद्रुक येथे वाळू वाहतूक करणारे ट्रॅक्टर पकडले

0
34

एरंडोल – लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । तालुक्यातील खडके बुद्रुक गावाजवळ चोरटी वाळूची वाहतूक करणारे ट्रॅक्टर एरंडोल पोलीसांनी जप्त केले असून याबाबत एरंडोल पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

एरंडोल पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, तालुक्यातील खडके बुद्रुक गावाजवळ विनानंबरचे ट्रॅक्टर व ट्रॉलीमध्ये बेकायदेशीर रित्या वाळूची चोरटी वाहतूक करत असल्याची गोपनीय माहिती एरंडोल पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ज्ञानेश्‍वर जाधव यांनी मिळाली. त्यानुसार त्यांच्या पथकाने शनिवारी १२ फेब्रुवारी रोजी रात्री ११.३० वाजता धडक कारवाई करत ट्रॅक्टर व ट्रॉली जप्त केले आहे. दरम्यान पोलिसांना पाहून ट्रॅक्टर चालक हा ट्रॅक्टर व ट्राली जागीच सोडून पसार झाला आहे. एरंडोल पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर जमा करण्यात आले. पोलीस कॉन्स्टेबल पंकज पाटील यांच्या फिर्यादीवरून अज्ञात ट्रॅक्टरचालक विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलिसहेड कॉन्स्टेबल काशिनाथ पाटील करीत आहे.


Protected Content

Play sound