Home अर्थ जळगाव जिल्हा अनलॉकच्या दिशेने : अशी मिळणार सवलत !

जळगाव जिल्हा अनलॉकच्या दिशेने : अशी मिळणार सवलत !

0
25

जळगाव प्रतिनिधी | राज्य शासनाने आज सायंकाळी अनलॉकची नियमावली जाहीर केली आहे. यानंतर आता जळगावचे जिल्हाधिकारी देखील नियमावली जाहीर करण्याचे संकेत आहेत. अर्थात, राज्याच्या नियमावलीवरून आपण जळगावात संभाव्य काय शिथीलता मिळेल याबाबत माहिती जाणून घ्या…

मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी आज दुपारी जाहीर केल्यानुसार राज्य शासनाने अनलॉकचे नवीन नियम जाहीर केले आहेत. या नियमानुसार खालील प्रकारे शिथीलता देण्यात येणार आहे.

१) राज्यातील सर्व दुकानांना सोमवार ते शुक्रवार या दिवसांमध्ये रात्री आठ वाजेपर्यंत उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे. तर शनिवारी दुपारी तीन वाजेपर्यंतच दुकाने उघडण्याची परवानगी देण्यात आली असून रविवारी मात्र सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अर्थात, दुकानदारांना पाच दिवसांमध्ये वाढीव वेळेसह शनिवारी अर्ध वेळ दुकाने उघडता येणार आहेत.

२) राज्यातील सर्व उद्याने बगिचे आदींना उघडण्याची परवानगी देण्यात आली आहे.

३) सर्व शासकीय आणि खासगी कार्यालये हे कर्मचार्‍यांच्या पूर्ण क्षमतेसह सुरू राहणार आहेत.

४) कृषी, उद्योग, स्थापत्य आदी क्षेत्रांना आधीप्रमाणेच पूर्ण क्षमतेने काम करता येणार आहे.

५) सलून, स्पा आदी दुकानांना ५० टक्के क्षमतेसह रात्री आठ वाजेपर्यंत व्यवसाय करण्याची परवानगी देण्यात आली आहे.

६)सिनेमागृहे (मल्टीप्लेक्स आणि सिंगल स्क्रीन); नाट्यगृहे, थिएटर्स आदींना मात्र परवानगी देण्यात आलेली नाही.

७) राज्यातील सर्व देवस्थांना सुध्दा उघडण्यासाठी परवानगी देण्यात आलेली नाही.

८) शाळा व महाविद्यालयांबाबत राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक बोर्ड तसेच टेक्नीकल बोर्डचे नियम लागू राहतील.

९) हॉटेल आणि उपहारगृहे हे सायंकाळी चार वाजेपर्यंत ५० टक्के क्षमतेने सुरू राहू शकतात.

१०) राजकीय, सामाजिक कार्यक्रम, अंत्यसंस्कार, जाहीर कार्यक्रम आदींसाठी आधीचेच निर्बंध लागू राहतील.

वरील नियमावली राज्य सरकारने जाहीर केली आहे. यानंतर आता जळगावचे जिल्हाधिकारी देखील स्वतंत्र नोटिफिकेशन जारी करून जिल्ह्यासाठी स्वतंत्र नियमावली जाहीर करणार आहेत.

 


Protected Content

Play sound