जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात राहणाऱ्या तरूणीला सोबतचे फोटो व व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देत अत्याचार केल्याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला होता. या गुन्ह्यातील संशयित आरोपी दानीश तडवी रा. जळगाव याला एमआयडीसी पोलीसांनी रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली आहे.
जळगाव शहरातील रामेश्वर कॉलनी परिसरातील एका भागात १८ वर्षीय तरूणी आपल्या परिवारासह वास्तव्याला आहे. पिडीत तरूणी ही अल्पवयीन असतांना सन २०१९ पासून संशयित आरोपी दानीश तडवीला ओळखत होती. त्यानंतर ओळखीचा फायदा घेत दानीश तडवी याने तरूणीसोबत वेगवेगळ्या ठिकाणी नेवून सुरूवातीला अश्लिल कृत्य केले. त्याचे फोटो आणि व्हिडीओ देखील बनविले. असे असतांना पुन्हा सन २०२२ मेहरूण परिसरात एका ठिकाणी पिडीत तरूणीला फोटो व्हिडीओ व्हारयल करण्याची धमकी देत तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर पुन्हा त्रास देणे सुरूच होते. हा प्रकार सहन न झाल्याने पिडीत तरूणीने हा प्रकार नातेवाईकांना सांगितले. त्यानुसार शनिवारी ७ ऑक्टोबर रोजी रात्री ९ वाजता एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. गुन्हा दाखल होताच पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक जयपाल हीरे यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे शोध पथकाच्या पथकाने संशयित आरोपी दानीश तडवी याला रामेश्वर कॉलनी परिसरातून अटक केली. ही कारवाई पोलीस उपनिरीक्षक रूपाली महाजन, पोहेकॉ अल्ताफ पठाण, पो.ना. योगेश बारी, मुकेश पाटील, सचिन पाटील, चंद्रकांत पाटील, ललित नारखेडे यांनी केली.