पहूर – लाईव्ह ट्रेन्डस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील एका गावात राहणाऱ्या अल्पवयीन मुलीला फूस लावून पळवून नेत तिच्यावर अत्याचार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. याबाबत पहूर पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत माहिती अशी की, जामनेर तालुक्यातील एका गावात १५ वर्षीय मुलगी आपल्या कुटुंबीयांसह वास्तव्याला आहे. दरम्यान गावातील गणेश शांताराम पवार याने पीडित तर मुलीला १८ मार्च रोजी रात्री ११.३० वाजता घरातून फूस लावुन पांढऱ्या गाडीत पळवून नेले. त्यानंतर एका गावाजवळील रस्त्यावर थांबून गाडीतच तिच्यावर अत्याचार केला. यासंदर्भात पिडीत मुलीने पहूर पोलिस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. तिच्या तक्रारीवरून संशयित आरोपी गणेश शांताराम पवार यांच्याविरोधात पहूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संदीप चेडे करीत आहे.