Home Cities यावल यावल येथे उद्या भव्य दंत शस्त्रक्रीया शिबिर

यावल येथे उद्या भव्य दंत शस्त्रक्रीया शिबिर


 

CoolClips peop2387

 

यावल ( प्रतिनिधी) येथे उद्या राष्ट्रीय आरोग्य अभियान व जिल्हा रुग्णालयाच्या माध्यमातुन आदिवासी व ग्रामीण भागातील नागरिकांसाठी भव्य वैद्यकीय आणि दंत शस्त्रक्रीया शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

येथील ग्रामीण रुग्णालयात उद्या (दि.२५) सकाळी १० वाजता संपन्न होणाऱ्या या वैद्यकीय व दंत शस्त्रक्रीया शिबिराचे उदघाटन जळगाव जिल्हा सामान्य रुग्णालयाचे शल्य चिकीत्सक डॉ. नागोजीराव जाधव, यांच्या हस्ते होणार असुन, प्रमुख पाहुणे म्हणुन जिल्हाधीकारी डॉ.आविनाश ढाकणे, जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.बी.एस. पाटील, जिल्हा परिषदेच्या आरोग्य अधिकारी डॉ.सौ.बबिता एस.कमलापुरकर, आणि जिल्हा सामान्य रुग्णालयाचे निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.विजय जयकर, उपस्थित राहणार आहेत. या वैद्यकीय शिबिराचा ग्रामीण नागरिकांनी व आदिवासी बांधवानी लाभ घ्यावा, असे आवाहन येथील ग्रामीण रुग्णालयाचे वैधकीय अधिक्षक डॉ.मनोज पाटील व तालुका वैद्यकीय अधिकारी डॉ.हेमंत बऱ्हाटे यांनी केले आहे.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound