जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या अनेक प्रलंबित मागण्यांसाठी गुरूवार २३ डिसेंबर रोजी दुपारी जिल्हा परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे. अशी माहिती संघटनेचे रामकृष्ण पाटील यांनी दिली आहे.
धरणे आंदोलनात अंगणवाडी केंद्रांच्या कामाचे ना दुरुस्त झालेले मोबाईल बदलून नवीन मोबाईल देण्यात यावे,पोषण ट्रॅकरमध्ये माहिती भरण्यासाठी येणाऱ्या अडचणी दूर करण्यात याव्यात, मोबाईल दुरुस्तीचा खर्च अंगणवाडी सेविकांवर लादण्यात येऊ नये, जिल्ह्यातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना भाऊबीज भेटीची रक्कम तातडीने अदा करावी,माझे कुटुंब माझी जबाबदारीच्या कामाचा मोबदला मिळावा, रद्द केलेली उन्हाळी सुट्टी देण्यात यावी, भारतरत्न डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम अमृत आहाराची थकीत रक्कम देण्यात यावी, अंगणवाडी सेविकांना रजिस्टर भरण्याची सक्ती करण्यात येऊ नये,सेवासमाप्ती लाभाची एक रकमी थकीत रक्कम अदा करण्यात यावी, अंगणवाडी सेविका मदतनीसांची रिक्त पदांची भरती करण्यात यावी,कोव्हिड-१९ मुळे मृत्यू झालेल्या अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या वारसांना विमा रक्कम अदा करण्यात यावी, चाळीसगाव-२ प्रकल्पातील अंगणवाडी कर्मचाऱ्यांना जिओ टॅगच्या फोटोची सक्ती बंद करावी.
यासह अन्य प्रलंबित मागण्यांसाठी जिल्हा परिषद समोर लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात येणार आहे तरी धरणे आंदोलनात गणवेश परिधान करून मोठ्या संख्येने सहभागी व्हावे आणि आंदोलन यशस्वी करावे असे आवाहन मिनाक्षी चौधरी, मंगला नेवे, चेतना गवळी, आशा जाधव, पुष्पा परदेशी, सुनंदा नेरकर, उज्वला पाटील, रेखा नेरकर, शकुंतला चौधरी, सविता महाजन, शोभा जावरे,संगिता निंभोरे,सरला पाटील,आक्का सपकाळे,बेबी पाटील,रत्ना सोनवणे,साधना पाटील, शुभांगी बोरसे, वंदना पाटील, वंदना कंखरे, नंदा देवरे, सविता वाघ यांनी केले आहे.