मुंबई – लाईव्ह ट्रेंड्स न्युज वृत्तसेवा | एसटी महामंडळाच्या विलीनीकरण संदर्भात युक्तिवादावर राज्य शासनातर्फे हायकोर्टात आज शुक्रवारी ११ मार्च राजी सुनावणी घेण्यात येणार होती. ती सुनावणी आज टळली असून, पुढील सुनावणी २२ मार्च रोजी या अहवालावर हायकोर्टात उत्तर देण्याचे निर्देश राज्य सरकारला देण्यात आले आहेत.
राज्यात गेल्या १२० ते १३० दिवसांपासून एसटी परिवहन कर्मचाऱ्यांचा विलीनीकरण, विविध न्याय्य मागण्या तसेच मयत कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांना मदत देण्यासंदर्भात संप सुरू आहे. या संपावर नेमण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर वेळोवेळी सुनावण्या घेण्यात आल्या आहेत. आज देखील ११ मार्च रोजी सुनावणी घेण्यात येणार होती. ही सुनावणी आजदेखील टळली असून पुढील सुनावणी २२ मार्च रोजी घेण्यात येणार आहे.
माणुसकीच्या दृष्टीने संपकरी कर्मचाऱ्यांवर कारवाई करू नये
एसटी महामंडळाच्या विलीनीकरण संदर्भात राज्य शासनाच्या नियुक्त करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीच्या अहवालावर हायकोर्टात युक्तीवाद संदर्भात आगामी २२ मार्च रोजी च्या सुनावणीवेळी राज्य शासनाला उत्तर देण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. दरम्यान संपकरी एसटी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करण्यात येऊ नये असे देखील निर्देश हायकोर्टाने दिले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचा संप औद्योगिक न्यायालयाने बेकायदेशीर असल्याचे घोषित केले आहे. असे असले तरी मानवतेच्या दृष्टिकोनातून या संपकरी कर्मचाऱ्यांवर कोणतीही कारवाई करू नये, असेही या आदेशात हायकोर्टाने म्हटले आहे.