नवी दिल्ली (वृत्तसेवा) : पुलवामा येथील दहशतवादी हल्ल्यात हुतात्मा झालेल्या जवानांना श्रद्धांजली वाहण्यासाठी व्यापाऱ्यांनी आज (सोमवार) देशव्यापी बंदची घोषणा केली आहे. महाराष्ट्रासह अन्य राज्ये यामध्ये सहभागी होतील, असे अखिल भारतीय व्यापारी महासंघाने सांगितले आहे.
महासंघातर्फे ठिकठिकाणी श्रद्धांजली सभा आयोजित करण्यात येणार असून, यावेळी पाकिस्तान व चीनच्या प्रतिकात्मक वस्तूंचे दहन करण्यात येणार आहे.या बंददरम्यान देशभरातील किरकोळ तसेच घाऊक बाजारपेठा बंद राहतील. याशिवाय व्यापारी हुतात्मा जवानांच्या कुटुबीयांसाठी आर्थिक मदत जमा करतील व ती थेट या कुटुंबीयांना दिली जाणार आहे.