सावदा – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । दिवाळीच्या पवित्र आणि मंगल वातावरणात सावदा शहरात भक्तीचा अनोखा दरबार सजणार आहे. “हारे का सहारा बाबा श्याम हमारा” या भावपूर्ण कीर्तनाच्या भव्य कार्यक्रमाचे आयोजन आज, शुक्रवार १७ ऑक्टोबर रोजी संध्याकाळी ७ वाजता करण्यात आले आहे. हा सोहळा बसस्टँडसमोरील दुर्गामाता मंदिरासमोर भक्तिमय वातावरणात पार पडणार आहे.
या प्रसंगी सुप्रसिद्ध श्यामप्रेमी गायक शिवम रावल आपल्या मधुर स्वरांतून श्यामभक्तीची रसधारा ओतणार आहेत. त्यांच्या भजनांच्या माधुर्याने वातावरण भारावून जाणार असून, उपस्थित श्यामभक्तांना आनंद, श्रद्धा आणि दिवाळीचा उत्साह यांचा सुंदर संगम अनुभवता येणार आहे.

कार्यक्रमाचे निमंत्रक सिमरन रेखा राजेश वानखेडे आणि समस्त श्यामप्रेमी मंडळ यांनी सर्व भाविकांना या भक्तीमय संध्या सोहळ्यात सहभागी होण्याचे सप्रेम आमंत्रण दिले आहे. भक्तांना या निमित्ताने दिवाळीचा खरा अर्थ, भक्ती, आनंद आणि एकात्मतेचा उत्सव अनुभवता येणार आहे.



